जळगाव प्रतिनिधी । येथील श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे 12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा होत असून देशभरातील हजारो विवाहेच्छूक वधू-वर पालकांसह मेळाव्याला उपस्थिती देणार आहेत.
मेळाव्याचे उदघाटन सकाळी 9 वाजता हॉटेल क्रेझी होम, आकाशवाणी चौक येथे होणार आहे. मेळाव्यात सकाळ पासून परिचय सत्र घेतले जाणार आहेत. विवाहेच्छूक मुलगा व मुलगी यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी, एकमेकांचा स्वभाव, विचार, आवडीनिवडी, भविष्यातील प्लॅनिंग, कौटुंबिक रचना याविषयी बोलावे यासाठी श्री अग्रवाल नवयुवक मंडळाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही सत्कार, भाषणे होणार नाहीत. विवाह आयुष्यभराचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करूनच विवाहेच्छूक वधू वरांनी विवाहाचा निर्णय घ्यावा असा विधायक हेतू ठेवण्यात आला आहे.
तीन जिल्ह्यांचा सहभाग
या मेळाव्याला जळगाव जिल्हा अग्रवाल संघटन, अग्रवाल महिला मंडळ, धुळे अग्रवाल समाज बायोडाटा बँक, नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज या संघटनांचे सहकार्य लाभत असून विवाहेच्छूक वधू वरांनी येतांना सोबत बायोडाटा आणावा, असे आवाहन नवयुवक मण्डलालचे सर्व कार्यकारीनी सदस्य व अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल यांनी केले आहे. ही माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत अध्यक्ष मनीष अग्रवाल, पुनमचंद पटवारी, राहुल अग्रवाल, अमित अग्रवाल, रुपेश अग्रवाल, महेश अग्रवाल यांनी दिली.