पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; सुरत येथील पतीसह सात जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथील माहेरवाशिनीचा चरित्र्याच्या संशयावरून माहेरहून व्यवसाय करण्यासाठी ५ लाख रूपयांसाठी मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या सुरत येथील पतीसह सासरकडील सात जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीत राहणारी २७ वर्षीय विवाहिता अर्चना (नाव बदलले) यांचा विवाहित सुरत येथील उमेश दत्तू लोहार यांच्याशी सहा वर्षांपुर्वी विवाह झाला. सुरूवातीला काही दिवस आनंदाने गेल्यानंतर जून २०१४ पासून पिठाची गिरणीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपयांची मागणी पुर्ण न झाल्यामुळे पती उमेश लोहार यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसचे विवाहितेच्या चरित्र्यावर संशय घेवून चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली आहे. यासाठी सासरे दत्तू भाऊलाल लोहार, सुमन दत्तू लोहार, जेठ जगदीश दत्तू लोहार, जेठाणी आरती जगदीश लोहार, नणंद मनिषा मनोज लोहार, नणंदोई मनोज लोहार सर्व रा. पांडेसरा, सुरत गुजरात यांनी देखील छळ करण्यासाठी पती उमेश लोहार याला प्रोत्साहित केले. हा प्रकार असहाय्य न झाल्याने विवाहित जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती उमेश लोहार सह सासरकडील सात जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content