जबरी चोरीतील दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षात बसलेल्या प्रवासाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल तसेच एक हजार रुपयाची रोकड घेत लुटल्याची घटना घडली होती या गुणात एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना  एमआयडीसी पोलिसांनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथून अटक केली आहे. आयुष सुवर्णसिंग तोमर वय 21 व पवन निवृत्ती लोहार दोन्ही रा. श्रीकृष्ण नगर, कुसुंबा अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

 

जळगाव रेल्वे स्टेशन वरून एमआयडीसी परिसरात रिक्षातून येत असताना  प्रवासी जितेंद्र सिंग रामकिशन मौर्या याला रिक्षा चालकासह एकाने चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील 15 हजारांचा मोबाईल व एक हजारांची रोकड असा मुद्देमाल लांबविले होता. याप्रकरणी 19 जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

 

लूट करणारे संशयित जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील सहाय्यक फौजदार, अतुल वंजारी,  किशोर पाटील, विकास सातदिवे , ईश्वर भालेराव,  साईनाथ मुंढे यांच्या पथकाने मंगळवारी आयुष तोमर व पवन लोहार या दोघांना अटक केली दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने 22 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यात पोलिसांनी रिक्षा सुद्धा जप्त केली आहे.  या दोन्ही आरोपींकडून लुटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Protected Content