चाळीसगावात उद्यापासून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन सोहळा

narendra maharaj prawachan

चाळीसगाव प्रतिनिधी । जगतगुरू नरेंद्राचार्य महाराजांचा प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन उद्या 3 जानेवारी 2020 रोजी मालेगाव रोड येथील जे.जे.चौधरी नगरच्या भव्य पटांगणात आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित सोहळ्यासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आला असून चाळीसगाव शहर व तालुका तसेच जळगाव जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येणार आहे. त्यासाठी सोहळ्याचे बॅनर मोठ्या प्रमाणे लावण्यात आले आहे. तसेच लाऊडस्पिकर द्वारे देखील प्रसार व प्रचार करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातून जवळपास 25000 भक्तगण उपस्थित राहणार असल्याचे उत्सव समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत 3 रोजी सकाळी 8 वाजता शिवाजी चौक सिग्नल पॉईंट येथून जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकाची मिरवणूक निघणार असून ही मिरवणूक शहरातून रेल्वे पुलावरून मालेगाव नाकामार्गे सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी साधक दीक्षा, षोडशोपचार पादुका पूजन व जगद्गुरु श्री यांचे प्रवचन होणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त भक्तगणांनी प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीचे तालुकाध्यक्ष, ज्ञानेश्वर अशोक पाटील, सचिव राजेश पवार, युवा प्रमुख पप्पू राजपूत, प्रबोधन प्रमुख अभिमान जगताप, प्रचार प्रमुख बाळकृष्ण सोळंके, अध्यात्मिक प्रमुख संजय गोविंद चौधरी, सामाजिक उपक्रम प्रमुख नंदू झाडे यांनी केले आहे.

Protected Content