धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या जवळ असलेल्या बांभोरी गावाजवळील जोडीला कॉम्प्लेक्स येथे एका गोडाऊनमधून २० हजार रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीला गेल्याची घटना शनिवारी (१० मे) सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर रामप्रकाश चावला (वय ३२, रा. सिधी कॉलनी जळगाव) यांचे बांभोरी गावातील झुलेलाल कॉम्प्लेक्समध्ये गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये त्यांनी जुन्या रॅकच्या लोखंडी प्लेट्स ठेवल्या होत्या. ८ मे ते १० मे या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गोडावून मधून अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या ३३० लोखंडी प्लेट्स चोरून नेल्या.
या चोरीच्या घटनेबाबत मयूर चावला यांनी शनिवारी १० मे रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि संशयित आरोपी सुनील यशवंतराव नन्नवरे (वय १९) आणि कपिल चैत्राम धनगर (वय १९, दोन्ही रा. जळगाव) यांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण तांदळे करत आहेत.