जळगाव (प्रतिनिधी) एकविसावे शतक हे ज्ञान अर्थव्यवस्थेचे युग म्हणून ओळखले जात असून या युगात पेटंटला महत्व असल्यामुळे बौध्दीक क्षेत्रात काम करणाज्या व्यक्तींनी पेटंट घेण्यावर अधिक जागरुकपणे भर द्यावा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विधी प्रशाळा आणि बौध्दीक संपदा अधिकार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.12 मार्च रोजी ` इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस् अॅण्ड पेटंट सिस्टीम इन इंडिया ` या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु बोलत होते. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, पेटंट कार्यालयाचे उपनियंत्रक अधिकारी डॉ.दिनेश पाटील, अॅड.सुशील अत्रे राष्ट्रीय प्रयोगशाळा, पुणे येथील वरिष्ठ वौज्ञानिक डॉ.भास्कर इदगे, डॉ.एस.ए.टी. सब्जेवारी, नवी दिल्ली येथील नुपूर गोयल, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर हे उपस्थित होते.
प्रा.पी.पी.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, जागतिक पातळीवर संशोधन आणि केलेल्या संशोधनाच्या उत्पादनाचे पेटंटद्वारे व्यवसायिकरण याला खूप महत्व आले आहे. सन 2016 मध्ये बौध्दीक संपदा अधिकाराबाबत राष्ट्रीय पातळीवर जे धोरण आखण्यात आले आहे त्यामुळे रोडम्ॉप मिळाला असून अधिक पेटंट प्रक्रिया करण्यावर भर देण्याचे आवाहन कुलगुरुंनी केले. विद्यापीठाने 42 पेटंट दाखल केलेले असून पौकी 14 पेटंटला मान्यता मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
उद्घाटनानंतरच्या सत्रात भारतातील पेटंट पध्दती आणि शासकीय पातळीवरील पेटंट कार्यालयांची माहिती व पेटंट कायदा याविषयी डॉ.दिनेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. देशातील लोकांनी पेटंट फाईल करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत असून पेपरलेस कामकाज करण्यावरही भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.एस.ए.टी.सब्जेवारी होते. त्यानंतरच्या सत्रात अॅड.सुशील अत्रे यांनी बौध्दिक संपदेचा भारतातील इतिहास नमूद करताना भारतात प्रचंड बौध्दीक संपदा आहे. मात्र त्याची किंमत होत नाही. भारतीय माणूस भावनाप्रधान असल्यामुळे तो अनेक गोष्टींकडे व्यवहार म्हणून बघत नाही. या देशातील हुशार माणसाला आपण लोकोपयोगी आहोत याचा अधिक अभिमान आहे. मात्र, व्यावसायिकीकरण करुन त्यातून पौसा मिळवण्यात त्याला कमीपणा वाटतो असे मत व्यक्त केले. लेखक, वादक, कलाकार, डिझायनर, चित्रकार हे बौध्दिक संपदा घेवू शकतात. त्यामुळे ते ज्ञान चिरंतन राहिल व पुढच्या पिढीसाठी कायम राहिल असे सांगून बौध्दीक संपदेकडे संपत्ती म्हणून बघण्याचे आवाहन त्यांनी केले. कॉपीराईट कायदयाविषयी देखील त्यांनी माहिती दिली. त्यानंतरच्या सत्रात डॉ.भास्कर इदगे यांनी भारत व परदेशातील बौध्दीक संपदा अधिकार याविषयी तर डॉ.सब्जेवार यांनी कायदयातील बौध्दीक संपदा, नूपूर गोयल यांनी वौज्ञानिक संशोधनातील बौध्दीक संपदा याविषयी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रा.भूषण चौधरी यांनी प्रास्ताविक केले. निकिता जौन यांनी सुत्रसंचालन केले. विधी प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ.एस.आर.भादलीकर यांनी आभार मानले. या राष्ट्रीय कार्यशाळेत 200 पेक्षा अधिक जणांनी भाग घेतला.