गोदावरी व्यवस्थापन व डॉ. वर्षा पाटील वुमेंस महाविद्यालयाची सॉफ्टएड कॉम्प्युटर्स कंपनीला औद्योगिक भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च व डॉ. वर्षा पाटील वुमेंस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यालयाची सॉफ्टएड कॉम्प्युटर्स SoftAid computers ला औद्योगिक भेट देण्यात आली.

कंपनीमध्ये प्रत्यक्ष कामकाज कसे चालते हे अनुभवणे त्याचा अभ्यास करणे असा उद्देश या औद्योगिक भेटीचा होता. SoftAid computers चे शीतल खडसे यांनी SDLC आणि त्याचे प्रॉडक्ट्स विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. Data Analyst गौरव भावसार यांनी Data Center, Firewall router, broadband connection इत्यादी संबंधी माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी महाविद्यालयामधील ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी SoftAid कंपनीस भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.

Protected Content