विविध विषयांवर गाजणार विद्यापिठाच्या सिनेटची सभा

जळगाव प्रतिनिधी | कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटची सभा ९ डिसेंबर रोजी होणार असून यात विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

या संदर्भात वृत्त असे की, कोरोनाच्या आपत्तीमुळे कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटच्या दोन सभा या ऑनलाईन या प्रकारात झाल्या होत्या. यामुळे यात काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात अडचणी आल्या होत्या. या अनुषंगाने ९ डिसेंबर रोजी सिनेटची ऑफलाईन सभा होत आहे.

विद्यापिठातील अनेक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. यात प्रामुख्याने ऑनलाईन परिक्षेच्या देयकातील घोळ, प्राध्यापकांचे चौर्यकर्म, रद्दीची विक्री, महाविद्यालयांमधील पदांना मान्यता यासह अनेक विषयांचा समावेश आहे. यावरून सिनेटचे सदस्य प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे. यामुळे आता सिनेटच्या सभेकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Protected Content