रावेर लोकसभा मतदार संघात १८ लाख ११,९५१ मतदार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 9 लाख 37 हजार 54 एवढी असून महिलांची संख्या 8 लाख 74 हजार 843 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 54 आहेत. अशी सर्व मिळून 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे- 
चोपडा (एसटी) विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पुरुष संख्या 164152, स्त्रीयांची संख्या- 156584, तृतीय पंथी संख्या 02 असे एकुण 320738 मतदार आहेत. रावेर विधानसभा मतदार संघात एकुण पुरुष संख्या 153883, स्त्रीयांची संख्या- 144447, तृतीय पंथी संख्या -02 असे एकुण 298332 मतदार आहेत. भुसावळ (एससी ) विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या-154058 स्त्रीयांची संख्या-143539 तृतीय पंथी संख्या 37 असे एकुण 297634 मतदार आहेत. जामनेर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या166837,स्त्रीयांची संख्या- 154519, तृतीय पंथी संख्या -00 असे एकुण 321356 मतदार आहेत.
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 151628, स्त्रियांची संख्या 142683, तृतीय पंथी संख्या-07 असे एकुण 294318 मतदार आहेत.  बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर विधानसभा क्षेत्र हे रावेर लोकसभा मतदार संघात येते तेथील पुरुष संख्या 146496 स्त्रीयांची संख्या- 133071, तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 279573 मतदार आहेत.

Protected Content