जळगाव लोकसभा मतदार संघात १९ लाख ८१, ४७२ मतदार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर स्त्रिया , पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या १९  लाख, ८१ हजार ४७२ एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

जळगावं लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 10 लाख 31 हजार 60 एवढी असून स्त्रियांची संख्या 9 लाख 50 हजार 329 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 83 आहेत. अशी सर्व मिळून 19 लाख 81 हजार 472 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे-

जळगांव शहर विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 207019 स्त्रीयांची संख्या- 188113, तृतीय पंथी संख्या 32 असे एकुण 395164 मतदार आहेत.  जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 1,66330 स्त्रीयांची संख्या- 1,55302 तृतीय पंथी संख्या -03 असे एकुण 321635 मतदार आहेत. अमळनेर (एससी) विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 155220 स्त्रीयांची संख्या-146010 तृतीय पंथी संख्या 3 असे एकुण 301233 मतदार आहेत. एरंडोल विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 147479, स्त्रियांची संख्या 138322 तर तृतीय पंथी संख्या 10 असे एकुण 285811 मतदार आहेत. चाळीसगांव विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 189801, स्त्रीयांची संख्या- 169851 तृतीय पंथी संख्या -29 असे एकुण 359681 मतदार आहेत. पाचोरा विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 165211 स्त्रीयांची संख्या – 152731 तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 317948 मतदार आहेत.

Protected Content