यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विरावली येथे आमदार लताताई सोनवणे यांच्या स्थानिक निधीतुन वार्ड क्रमांक दोन मध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याचे कामास आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी भुमीपुजन करून सुरूवात झाली आहे.
तालुक्यातील विरावली गावाच्या कार्यक्षेत्रात चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या विकास निधीतुन व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विरावली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या पाठपुराव्याने विरावली गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली असुन शासनाच्या विविध विकास कामांना वेग मिळाला आहे तर काही कामे ही पुर्णत्वाकडे जात असुन , तर काही कामे ही प्रगती पथावर आहेत. चोपडा मतदार संघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या स्थानिक निधीतुन वार्ड क्रमांक दोन मध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम आज रोजी दिनांक ७ सप्टेंबर रोजी भुमीपुजन करून कामास सुरूवात झाली आहे.
प्राध्यापक माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने विरावली गावामध्ये विकासाची कामे होत आहे. विरावली तालुका यावल येथे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक दोन मध्ये सुमारे दहा लक्ष रुपये खर्चाच्या निधीतुन पेवर ब्लॉगच्या कामास नारळ फोडून तुषार (उर्फ मुन्ना ) पाटील व सरपंच कलीमा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच ईश्वर पाटील , ग्राम पंचायत सदस्य नथ्थु अडकमोल, हमीद तडवी, मनिषा पाटील, राजेन्द्र पाटील , महबुब तडवी, गफ्फार तडवी , हबीब तडवी , रुबाब तडवी व ग्रामस्थ मोठया संख्येत या प्रसंगी उपस्थित होते. शासनाच्या निधी तुन सातत्याने होत असलेल्या विविध विकास कामांमुळे ग्रामस्थानमधे आनंदाचे वातावरण निर्माण झालेल आहे