बारी समाजातील ३५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

WhatsApp Image 2019 07 14 at 6.24.30 PM

जळगाव (प्रतिनिधी) :समस्त बारी पंच मंडळ जळगाव व बारी युवा प्रकोष्ठ जळगाव (महाराष्ट्र),बारी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पांझरापोळ संस्थान नेरी नाका जळगाव येथे इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर, पी.एच.डी,विद्यार्थ्यांचा सत्कार आज रविवार १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते गौरव योगेश बारी यांने इयत्ता दहावी मध्ये ९४.२० %गुण मिळविले, इयत्ता १२ वि मधून भूषण विनोद बारी याला ८९.८० टक्के मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार्यालय मुंबई न्यायाधीश नरेश सोमनाथ बारी तसेच प्रमुख पाहुणे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील.,महापौर.सीमा सुरेश भोळे, .नगरसेविका शोभाताई दिनकर बारी, .जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील,सिनेट सदस्य नितीन बारी , आरपीएफ जळगाव रेल्वे स्टेशन दिलीप पुना बारी, रायसोनी काँलेजचे रफिक जमील शेख, बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.निलेश अस्वार, हेमंत साने ,रमेश हरीशचंद्र बारी, , जेष्ठ पत्रकार शिवलाल बारी, यशवंत बारी, तुळशीदास बारी,तसेच बारी पंच मंडळाचे अध्यक्ष लतीश बारी, उपाध्यक्ष विजय बारी, सचिव सुनील बारी, सहसचिव मयूर बारी, खजिनदार बालमुकुंद बारी ,नितीन बारी, महेंद्र बारी, विजय बारी, हर्षल बारी. अरुण बारी, पवन बारी, नितीन बारी,बारी युवा प्रकोष्ठचे जिल्हा अध्यक्ष सुनील बारी, जळगाव शहर अध्यक्ष मनोज बारी, देवेंद्र बारी, प्रवीण बारी, राजू बारी, बुधा बारी, गणेश बारी सागर बारी गजानन बारी, रमेश बारी पंकज बारी व इतर सर्व सदस्य व सर्व बारी समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पंकज बारी व माधवी बारी यांनी केले .श्री पी पी पाटील यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच नरेश सोमनाथ बारी यांनी प्रतिमापूजन केले त्यानंतर कुलगुरू प्रा. पी. पी पाटील, शंभू पाटील. रफिक जमीर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजातील एकूण ३५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच वृक्ष वाटप सुद्धा करण्यात आले.

Protected Content