इंग्लंडसमोर २४२ धावांचे आव्हान

लंडन वृत्तसंस्था । विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझिलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान ठेवले आहे.

आज विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतीम सामना इंग्लंड आणि न्यूझिलंड यांच्यात खेळला जात आहे. यात न्यूझिलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. तथापि, यजमान संघाच्या गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीने किवीजला मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. ख्रिस वोक्सने मार्टिन गप्टिलला(१९) पायचीत करत न्यूझिलंडला पहिला धक्का दिली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने डाव सावरण्याची प्रयत्न केला असला तरी प्लंकेटने विल्यमसनला(३०) बाद केले. निकोल्सने एक बाजू लाऊन धरली तरी प्लंकेटने निकोल्सला ५५ धावांवर बाद केले. यानंतर टॉम लॅथमने चांगली फलंदाजी करून न्यूझिलंडला २४१ धावसंख्या करण्यासाठी मदत केली.

Protected Content