आयपीएलचा मार्ग मोकळा : केंद्र सरकारने दिली परवानगी !

नवी दिल्ली । केंद्र सरकारने खेळाडूंना युएई येथे प्रवासाची परवानगी दिल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असून १९ सप्टेंबरपासून याचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयपीएलचा तेरावा हंगाम भरवण्यासाठी बीसीसीआयला परवानगी मिळाली आहे. केंद्र सरकारने भारतीय खेळाडूंना युएई प्रवासाची परवानगी दिली असून १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. सध्याच्या हंगामासाठी विवो ही चीनी कंपनी स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर राहणार असल्याचेही आजच्या बैठकीत ठरले आहे.

कोरोनामुळे यंदाच्या आयपीएलवर प्रश्‍नचिन्ह लागले असतांना बीसीसीआयला आता केंद्र सरकारच्या परवानगीने दिलासा मिळाला आहे. तर मैदानात प्रेक्षक असले तर चांगलच आहे. परंतू खेळाडू आणि पर्यायाने प्रेक्षकांची सुरक्षा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी युएई क्रिकेट संघनेसोबत चर्चा करुन योग्यवेळी निर्णय घेतला जाणार असल्याच गव्हर्निंग काऊन्सिलने ठरविले आहे.

Protected Content