जन आशीर्वाद यात्रा यशस्वी करण्यासाठी कामाला लागा – ना. गुलाबराव पाटील (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 07 14 at 7.44.23 PM

जळगाव (प्रतिनिधी) :  राज्यात जेव्हा शिवसेनेची पडझड सुरु होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेवून स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यावेळी शिवसेनेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करण्याचे निश्चित केले. त्यानुसार त्यांच्या दौऱ्याची सुरवात जिल्ह्यातील अमळनेर येथून झाली होती. त्यांच्या दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. तसाच प्रतिसाद जनआशीर्वाद यात्रा दौऱ्याला मिळाला पाहिजे, दौरा कसा यशस्वी करायचा? हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे सर्वानी तयारीला लागा, असे आवाहन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व युवासेना आयोजित जिल्हा बैठकीत बोलत होते.

शहरातील केमीस्ट भवन येथे आयोजित युवासेना-शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर युवासेनेचे विस्तारक कुणाल दराडे, सहसंपर्क प्रमुख संजय सावंत, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. चिमणराव पाटील, मनपा विरोधीपक्षनेते सुनील महाजन, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, राजेंद्र चव्हाण, मनपा उपगटनेते प्रशांत नाईक, शहर प्रमुख शरद तायडे, युवा जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, ता. प्रमुख वासुदेव पाटील, रावसाहेब पाटील, मंगला बारी आदींची उपस्थित होते.

याप्रसंगी युवासेना विस्तारक कुणाल दराडे यांनी सांगितले की, ठाकरे कुटुंबातील तीसऱ्या पिढीच्या राजकारणाला सुरुवात होत आहे. आदित्य ठाकरे हे दि.१८ पासून महाराष्ट्र दौरा करणार असून जनआशिर्वाद यात्रा काढली जाणार आहे. त्याची सुरुवात जळगाव पासून होणार आहे. आणि अख्खा महाराष्ट्र आदर्श घेईल, असा कार्यक्रम आपण राबविणार आहोत. या दौऱ्यात जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचे काम सर्वांना करायचा आहे, असे आवाहन श्री दराडे यांनी केले. दरम्यान, सहसंपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले की, आदित्य ठाकरेच्या दौऱ्याला जळगावातून सुरुवात होत असल्याने अतिषय भव्य स्वरुप असणे आवश्यक आहे. तसेच लाखो शाखा उघडण्याचे काम आपण हाती घेतले आहे. हे काम देखील मन लावून करा आणि गावा-गावात वार्डा-वार्डात शाखाप्रमुखांच्या नेमणूका करा, असे आवाहन श्री.सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले.

‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ वर पहा बैठकीचा वृतांत

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/633346590495189/

Protected Content