यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोरपावली येथे महेलखेडी ते कोरपावली पर्यंत नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेले असून त्यांना साईड पट्ट्या नसल्याने या मार्गावर वाहनधारकांचे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत कोरपावलीचे लोकनियुक्त सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विलास अडकमोल यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या कडे निवेदन दिले आहे.
सरपंच विलास अडकमोल यांनी यावलच्यासार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या लिखित निवेदना म्हटले आहे की, महेलखेडी ते कोरपावली या प्रमुख रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले असुन, गावाच्या दृष्टीने कोरपावली गावातुन जाणारा मार्गावरील हा रस्ता प्रमुख असुन या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते असे असतांना मात्र या रस्त्याच्या दोन्ही साईड पट्या नसल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने समय सूचकता बाळगुन वेळेवर या मार्गावरीत रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या कडेला साईडपट्टया तयार आणि या मार्गावर गतीरोधक बनवण्याची मागणी यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ लिपिक विकास जंजाळे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.