आठवणींच्या हिंदोळ्यावर रंगला यावल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !

यावल प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात भावनांचा गहिवर पहायला मिळाला.

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष ऍड. अजय कुलकर्णी, मनोहर पाटील, गुलाम गौस खान, अय्युब खान, ऍड. राजू गडे , अश्फाक खान ,डॉ. हेमंत येवले उपस्थित होते. अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषवले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले. त्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कॉम्प्युटर बी.एस्सी. असलेला माजी विद्यार्थी डिगंबर महाजन याला संगणक क्षेत्रातील दोन पेटंट मिळाल्याबद्दल प्राचार्यांच्या शुभहस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ऍड. देवकांत पाटील, सुनील पाठक, नरेंद्र नेवे, संदीप सोनवणे, दीपक पाटील, ऍड. उमेश बडगुजर, अय्युब खान, गुलाम गौस खान, माळी सर, अमीन बाबू यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या विकासाकरिता सूचना मांडल्या. डिजिटल ग्रंथालय, डिजिटल लॅब, कॅम्पस इंटरव्ह्यू, व्यवसायिक कौशल्य आधारित कोर्स या संदर्भात सूचना मांडल्या गेल्या. ऍड. अजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. मनोहर पाटील यांनी सांगितले की, मुलींची संख्या महाविद्यालयात वाढली पाहिजे. मुलींसाठी तक्रार पेटी गरजेची आहे, जेणेकरून त्यांना सुरक्षित वाटेल.

याप्रसंगी नरेंद्र नेवे, सुनील पाठक, योगेश लावणे, निलेश बारी, सागर देवांग, अमित भंडारी, गुलाम गौस खान, इंदीरा गांधी गर्ल्स हायस्कुलचे अय्युब खान, विवेक देवरे, एम. के. पाटील यांनी महाविद्यालय विकासासाठी देणगी जाहीर केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. संध्या सोनवणे यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी पैसे, मार्गदर्शन, व्याख्यान, अध्यापन या विविध स्तरावर योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.ए. पी. पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य संजय पाटील, समितीचे सचिव डॉ. एस. पी. कापडे, प्रा. एस. आर. गायकवाड, प्रा. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, मनोज पाटील, प्रा. डॉ. हेमंत भंगाळे, मुकेश येवले, संजय कदम, व्ही. व्ही. पाटील,मिलिंद बोरघडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content