कोळवद येथे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद येथील ३२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी २ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घनश्याम रामसिंग पाटील (वय-३२) रा. कोळवद ता. यावल असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, घनश्याम पाटील हे हात मजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. आज बुधवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरात कुणीही नसतांना लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी राजू पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावलच्या ग्रामीण रूग्णालयात मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिडके यांनी केले .घनशाम पाटील यांनी आत्महत्या का केली ? हे स्पष्ट होवु शकले नाहीत . घटनेचे वृत्त कळताच पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील व त्यांच्या सहकार्यानी मदतीसाठी धाव घेतली .

Protected Content