मुख्याध्यापक सुनिल माळी राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

यावल, प्रतिनिधी |  येथील बालसंस्कार विद्या मंदीरचे मुख्याध्यापक सुनिल माळी यांना राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेचे मुख्याध्यापक सुनील कृष्णाजी माळी  यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२० – २१ राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार  दि.१० ऑक्टोबर रोजी दर्जी फाऊंडेशन जळगाव येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक अ. फ. भालेराव, सिंगल वुमन फाऊंडेशन अध्यक्षा मिनाक्षी चव्हाण, राजपूत करणी सेना कार्याध्यक्ष  विलाससिंह पाटील ,  लोक कलावंत गणेश अमृतकर , जिल्हा उपाध्यक्ष जी.एच. खंडाळकर, संस्था अध्यक्षा .संदीपा वाघ, सानेगुरुजी विद्या मंदिर सेवानिवृत्त मुख्याध्यापक  एस.आर.वाघ  यांची उपस्थीती होती. सुनील माळी यांना त्यांच्या  शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनिय कार्य तसेच विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण केल्याबद्दल सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले. माळी सर यांना राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश वाणी व सर्व संचालक मंडळ, तसेच बाल संस्कार शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

Protected Content