रस्त्यावरील जीवघेणा खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी

यावल प्रतिनिधी | यावल ते फैजपूर दरम्यान चितोडा गावाजवळ वळणरस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गच्या यावल फैजपुर रस्त्या दरम्यान असलेल्या चितोडा गावा जवळील रोडाच्या मध्यभागी वळणावर पडलेला खड्डा हा अपघातास आमंत्रण देणारा व जिवघेणा ठरत असुन, तात्काळ या खड्डयास दुरूस्त करावे अशी मागणी असंख्य वाहनधारका कडुन करण्यात येत आहे.

अंकलेश्वर बुर्‍हाणपुर या राज्य मार्गावरील यावल ते फैजपुर या रस्त्यावरील चितोडा गावाच्या बस स्थानकाजवळील वळणाच्या रस्त्यावर मध्यभागी मोठेखड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावरील सातत्याने वाहनांची वाढती वर्दळीमुळे हा अपघाताच्या अत्यंत धोकादायक वळणावर पडलेल्या खड्डयांमुळे दुचाकी वाहनधारकाकडून या खड्डयाला चुकवितांना या ठिकाणी वारंवार अपघात होतांना दिसत आहेत.

यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या मार्गावरील पडलेल्या धोकादायक व अपघातास कारणीभुत ठरणार्‍या खडयाची दुरुस्ती करून वाहनाधारकांचे होणारे अपघात टाळावे अशी अपेक्षाकृत मागणी वाहनधारकांकडुन करण्यात येत आहे

Protected Content