धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. २९ मार्च २०२५ रोजी, महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची परीक्षा फी भरताना चोरी झाली. सदर विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असल्याने तिला या घटनेचा मोठा फटका बसला. या घटनेने विद्यार्थी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून होत आहे. सीसीटीव्ही बसवल्यास चोरी, गैरप्रकार आणि इतर अनुचित घटना रोखता येतील, तसेच महाविद्यालयातील शिस्त व सुरक्षिततेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरेल. यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची अपेक्षा आहे.