पहूर येथे हभप पांडुरंग महाराजांचे प्रेरणादायी कीर्तन उत्साहात

पहूर ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तरुणांनो, व्यसनमुक्त व्हा! तुमची पत्नी देवाकडे प्रार्थना करते की माझा कुंकवाचा धनी व्यसनमुक्त होवो. किमान तिच्या प्रेमाखातर तरी व्यसनांचा त्याग करा,” असे हृदयस्पर्शी आवाहन हभप पांडुरंग महाराज मालपुरकर (नंदुरबार) यांनी केले.

लेले नगर येथील श्री क्षेत्र हनुमान मंदिरात सुरू असलेल्या रौप्य महोत्सवी किर्तन सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ते प्रवचन देत होते. त्यांनी सांगितले की, सन्मार्गाने पैसा कमवा, तसेच देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. या कार्यक्रमात हभप पांडुरंग महाराज यांच्या हस्ते शिवभक्त रंगनाथ महाराज, प्रमोद घोंगडे, विनोद बोरसे, शहादू सोनवणे आणि ज्ञानेश्वर चव्हाण यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मृदंगाचार्य हभप अवधूत महाराज, गायनाचार्य हभप मुरलीधर महाराज, हभप कल्पेश महाराज, तसेच समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष हभप मुकुंदा महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज, हभप पवन महाराज, हभप प्रकाश महाराज आणि हभप राजू महाराज यांची उपस्थिती होती.

हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय बनकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौथे, सचिव विशाल चव्हाण यांच्यासह विश्वस्त मंडळ, भजनी मंडळ, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले.

Protected Content