अपक्ष उमेदवारीचे वृत्त निराधार- दिलीप खोडपे ( व्हिडीओ )

dilip khodpe jamnerजामनेर प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे ना. गिरीश महाजन यांच्या विरोधात उमेदवारी करणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचा निर्वाळा त्यांनीच दिला आहे. एका लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी याबाबतच्या वृत्तांना विराम दिला.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. याबाबत सोशल मीडियातदेखील खर्मग चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमिवर, ना. गिरीश महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी खुद्द दिलीप खोडपे यांच्याशी एका लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला असता त्यांनी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भाजप हा लोकशाहीवर आधारित पक्ष असून यामुळे आपल्यालाही उमेदवारी मिळावी असे वाटत असल्याने अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजपमध्ये जुने नेते आणि पदाधिकार्‍यांवर होणार्‍या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण अर्ज दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. आपण अजून फक्त अर्ज घेतलेलाच असून तो भरलेला नसल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

पहा : लाईव्ह व्हिडीओत पहा नेमके काय म्हणाले दिलीप खोडपे सर ?

https://www.facebook.com/arvind.deshmukh.9/videos/1887148648054418

Protected Content