सावदा येथे नपाची थकबाकी दुकान धारकांवर कारवाई ; ६ दुकान सील

सावदा प्रतिनिधी । शहरातील व्यापारी संकुलातील दोन वर्षापासून नगर परिषदच्या मालमत्ता कर व भाड्याची रक्कम थकीत आहे. या व्यापारी संकुलातील थकबाकीदार असलेल्या ६ दुकानांना आज दि. ७ रोजी  नगरपालिका वसुली पथकाने सील केले. तसेच काही व्यापारी संकुलातील दुकानदारांकडून १ लाख २२ हजार ३२२ वसूल करण्यात आले.

शहरात १२७ गाळे धारक दुकानदार असून त्यांना वेळो वेळी नगरपरिषद मार्फत वसुली करीता व कर भरणा करावा अशे नोटीस बजावली असून सुद्धा काही दुकानदार कर भरणा केला नाही.त्याच्या कडून थकीत कर रक्कम व भाडे वसूल करण्यात आले ज्यांनी भरण्यात असमर्थथा दाखवली त्यांचे दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली.ही कार्यवाही मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे मार्गदर्शना खाली वसुली पथकात कर निरिक्षक अनिल आहुजा,वसुली विभागातील लिपिक अरुण ठोसरे, आकाश तायडे, संध्या वाणी, लता भंगाळे वसुली विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सर्व नागरिकांनी कर भरणा करावा व जप्तीचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.

 

Protected Content