शेंदुर्णी येथे विलगीकरण कक्ष भरवस्तीत उभारण्यास गावकऱ्यांचा विरोध

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी । नगरपंचायत कार्यालयाच्या नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय नागरिकांस अनुभवयास येत आहे. नगरपंचायततर्फे कोरोना संशयितांसाठी विलगीकरण कक्ष भर वस्तीत उभारण्यात येत असल्याने याला सुनील गुजर यांनी विरोध दर्शवून पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे.

गावाबाहेर भरणारा आठवडे बाजार नगरपंचायतीने रीतसर व्यापाऱ्यांकडून पावत्या फाडून महिन्याभरापासून गावाच्या मध्यवस्तीत भरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक पाहावयास मिळाला तो उद्रेक संपतो न संपतो तोच कोरोना संशयित नागरिकांना वस्तीत आणून आजाराला निमंत्रण देण्याचे काम नगरपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्याधिकारी करीत असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. काल रात्री अकरा वाजता अचानक पारस मंगल कार्यालयाजवळ साफसफाई व बॅरिकेट लावण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी काही नगरसेवक उपस्थितीत होते. क्वारंटाईन सेंटर गावाच्या भर वस्तीत उभारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन एकर जागा व इमारत उभी असताना भर वस्तीत क्वारंटाईन सेंटर उभारण्याची गरज काय ? असा सवाल सुनील गुजर यांनी उपस्थित केला आहे. याची विचारणा करण्यासाठी सुनील गुजर व नागरिक नगरपंचायतमध्ये गेले असता तेथे भलेमोठे कुलूप लावलेले दिसून आल्याने ते आवाक झालेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांना साथ रोग निवारण कक्ष व इतर सोयी उपलब्ध करून देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य होते. मात्र तेथे कोणीही नसल्याने नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांना निवेदन दिले. यावेळी परिसराचे नेते राजेंद्र भारुडे, रवी गुजर, सुनील गुजर ,भैया सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गावाच्या एक किलोमीटर शाळा व जिनिंग उपलब्ध मग त्याचा विचार न करता मध्यवस्तीत क्वारंटाईन सेंटर उभारण्यात सत्ताधाऱ्यांना काय स्वारस्य आहे असा सवालही वस्तीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Protected Content