भुसावळात महिलांनी पर्यावरणाचा संदेश देवून साजरी केली धुळवड

 

भुसावळ, प्रतिनिधी । येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी रुढी, परंपरा यांना फाटा देत आगळयावेगळ्या पद्धतीने ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत होळी साजरी केली.

चक्रधर नगर भागात मंगळवार १० रोजी दुपारी ४ वाजता आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. वंदना वाघचौरे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार उज्वला बागुल , पुष्पा चौधरी(आजी ) ,सैनिक पत्नी उज्वला चौधरी ,योग शिक्षिका मंदाकिनी केदारे, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महिलांनी दिपप्रज्वलना सारख्या रूढि परंपरा यांना फाटा देत पाण्याची नासाडी न करता लावलेली झाडे जगवा असा संदेश दिला. टीव्ही टॉवर मैदानावरिल लावलेल्या झाडांना जगविण्या करीता झाडांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. धुलीवंदनाचे औचित्य साधुन महिलांनी आपापसातील हेवे-दावे , मतभेद बाजूला सारुन संगीत खुर्ची, लकी ड्रा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांत सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला. यावेळी डॉ. वंदना वाघचौरे , उज्वला बागुल , समाज कल्याण विभागाच्या शोभा चौधरी, यांनी मार्गदर्शन केले. तर प्रास्तावीक संस्थाध्यक्षा राजश्री नेवे यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री वाणी यांनी तर आभार सुनीता चौधरी यांनी मानले . संगीत खुर्ची मध्ये उषा राणे, तर लकी ड्रा मध्ये धनश्री राणे, राजश्री बादशहा, जयश्री वाणी यांनी बक्षीसे पटकाविली. मान्यवरांचे हस्ते विजेत्यांना बक्षिस देण्यात आले . यशस्वीतेकरिता माया चौधरी , यांच्यासह स्मिता माहूरकर, वैशाली सरोदे, कल्पना बोंडे, सुनंदा पाटील, अश्विनी जैस्वाल, वंदना झांबरे , लिना इंगळे, वसुंधरा महाजन, अर्चना इंगळे, भाग्यश्री नेवे,तर विशेष सहकार्य उमेश नेवे , पर्यावरण प्रेमी चंद्रशेखर जंगले गोसेवक रोहीत महाले ,प्रणव डोलारे, राजेश ठाकुर, मयुर सावकारे ,श्याम शर्मा यांनी झाडांना पाणी देण्यासाठी पाण्याची व्यवस्था करुन देत विशेष परिश्रम घेऊन सहकार्य केले. सखी श्रावणी संस्थेने घेतलेल्या कार्यक्रमाचे उपस्थित महिलांसह व जेष्ठ महिला व वृद्ध आजी यांनी विशेष कौतुक केले . धूलिवंदनाला पहिल्यांदा रंग खेळून आनंद मिळाल्याच्या भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या तर अनेक मैत्रीनींना मिळालेल्यां सुखद धक्याने डोळे पानावले.

Protected Content