जामनेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह राहते. मंगळवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पीडित मुलगी ही तिची मावशीकडे भेटण्यासाठी घरी गेली होती. परंतु ती मावशीच्या घरी पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, तिचे मैत्रीणी व नातेवाईक इतरांकडे तपास केला. परंतु काहीही माहिती मिळाली नाही, अखेर पोलिसांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फुस लावून अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार जामनेर पोलीस ठाण्यात बुधवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन पाटील करत आहे.

Protected Content