
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरासह जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला जळगाव शहर पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली आहे. त्याने जळगाव शहरातील बद्री विशाल अँड जे.के. पान सेंटर दुकान फोडून ५५ हजार रुपयांची रोकड लांबवली होती. या गुन्हा त्याला अटक करण्यात आले आहेत. दगडूबा मुकुंदा बोर्डे वय-३८ रा.पेरजापूर ता. भोकरदन जिल्हा जालना असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.
जळगाव शहरातील शाहूनगर येथे बद्री विशाल अँड जे.के. पान मंदिराचे दुकान फोडून दुकानातून ५५ हजार रुपयांची रोकड चोरून दिल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली होती. या संदर्भात दुकानदार विशाल कैलास शेळके वय-३७, रा. शाहूनगर यांनी जळगाव शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय सुनील पाटील, पोलीस कर्मचारी उमेश भांडारकर, सतीश पाटील, योगेश पाटील, अमोल ठाकरे, प्रणव पवार यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संशयित आरोपी हा जळगाव रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याचे तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याला अटक केली. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव शहर सिल्लोड, चाळीसगाव, अजिंठा आणि इतर ठिकाणी असे त्याच्यावर वेगवेगळे चोरीचे १३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर अजून काही गुन्हे दाखल असतील याचा देखील शोध घेणे सुरू आहे.



