भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

टोकिया वृत्तसंस्था | काल पुरुष हॉकी संघाच्या चमकदार कामगिरी नंतर आज महिला हॉकी संघाने ही ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

काल पुरुषांच्या हॉकी संघाने ब्रिटन सारख्या बलाढ्य संघाला धूर करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता या पाठोपाठ आज भारतीय हॉकी महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चा सामना 10 या प्रकारे जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला हॉकी संघ हा पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहचला असून यामुळे आजचा विजय हा ऐतिहासिक मानला जात आहे.

खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला.

Protected Content