भारतीय संघाचे विंडिजसमोर ३८८ धावांचे आव्हान

India and West Indies team

 

विशाखापट्टणम वृत्तसंस्था । विशाखापट्टणम येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला दुसरा वन-डे सामना सुरु असून रोहित शर्माचे दीडशतक आणि के.एल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहित शर्माच्या १५९ धावा तर राहुलच्या १०२ धावांच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३८७ धावा ठोकल्या.

टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या विंडिजसाठी हा निर्णय चांगलाच महागात ठरला. भारतीय सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करत, २२७ धावांची सलामी दिली. नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. दोन्ही सलामीवीरांनी आपली शतकं झळकावत विंडीजच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली. यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी मधल्या फळीत फटकेबाजी करत भारताची बाजू अधिक भक्कम केली. ऋषभ पंत फटकेबाजी करण्याच्या नादात ३९ धावांवर माघारी परतला. मात्र श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

Protected Content