जळगावात स्त्रीरोग तज्ञ संघटनातर्फे दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन

Doctor news

जळगाव प्रतिनिधी । स्त्रीरोग तज्ञ संघटना यांच्या वतीने दोन दिवसीय अधिवेशनाचे शहरातील प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाला राज्यातील 400 हून अधिक डॉक्टरांची उपस्थिती राहणार असल्याचे माहिती, आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुजाता महाजन यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्त्रीरोग तज्ञ संघटनेतर्फे शहरात 21 आणि 22 डिसेंबर रोजी एमआयडीसी परिसरात असलेल्या प्रेसिडेंट कॉटेज या हॉटेलमध्ये दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याहस्ते होणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी वाढता सिझेरियन प्रसुती संदर्भात समज-गैरसमज याबाबत आयएमए हॉल येथे मार्गदर्शन होणार आहे. 21 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील डॉक्टरांनी देखील नोंदणी केलेली आहे. ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, या संदर्भात पोस्टर प्रेसेंटेशनचे देखील आयोजन करण्यात आले आहे. युवा डॉक्टरांसाठी उपकरणांचा डेमो दाखवण्यात येणार आहे सोबत विशेष व्याख्यान आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आणि गोदावरी स्मरणिकाचेही प्रकाशन करणार असून या स्मरणिकामध्ये महिलांवरील ताण-तणाव कमी करण्यासाठी असलेले उपयोगी लेख देखील देण्यात आलेले आहे.

पत्रकार परिषदेत यांची होती उपस्थिती
आयोजित पत्रकार परिषदेत स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुजाता महाजन, डॉ. सारिका पाटील, स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रोहिणी देशपांडे, डॉ. वैशाली चौधरी, डॉ. संपदा महाजन, डॉ. दीपक पायघन, डॉ. संदीप पाटील, डॉ. वर्षा लहाडे, डॉ. अशोक वाघ, डॉ. शाहिद खान आणि डॉ. सुमन घोलप यांची उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील डॉक्टरांची अधिवेशनाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Protected Content