रावेर तालुक्यात शेतीच्या नुकसान भरपाईचे 12 कोटी 84 लाख रुपये प्राप्त

raver 2

 

रावेर प्रतिनिधी । अतिवृष्टिमुळे तालुक्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. शेतक-यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून सुमारे 12 कोटी 84 लाख रुपये रावेर तहसील प्राप्त झाले आहे.

यावर्षी तालुक्यात अतीवृष्टिमुळे कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून नुकसाग्रस्त शेतक-यांना 8 हजार रुपये हेक्टर प्रमाणे मदत करण्यात येणार आहे. एका शेतक-याला जास्तीत-जास्त दोन हेक्टर पर्यंत मदत शासनाकडून मिळणार आहे. यापूर्वी पहिला हप्ता म्हणून 10 हजार 364 शेतक-यांना 7 कोटी 40 लाख 29 हजार रूपयांची हेक्टरी प्रमाणे मदत करण्यात आली आहे. तर दूसरा हप्ता 12 कोटी 84 लाख रुपयांचा प्राप्त झाला असून त्यापैकी 7 हजार 887 शेतकऱ्यांना 6 कोटी 64 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी तलाठी यांच्याकडे खाते नंबर द्यावा, आणि तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांचे बाकी असलेले खाते नंबर संबधित गावातील तलाठी यांच्या देण्यात यावा, त्याप्रमाणे शेतक-यांच्या खात्यावर अतिवृष्टी मदत रक्कम जमा करण्यात येईल, असे आवाहन येथील निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांनी सांगितले आहे.

Protected Content