दिलासा : कोरोनाच्या सक्रीय रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाची तिसरी लाट ओसरतांनाचे आता दिसून येत असून देशभरात आता रूग्णसंख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ५८ हजार ७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख ५० हजार ४०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तीन दिवसांनंतर देशात एका दिवसात मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजारहून कमी झाली आहे. काल दिवसभरात देशात कोरोनामुळे ६५७ जणांचा मृत्यू झाला. ६ फेब्रुवारीला देशात ८९५ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले होते.

लक्षणीय बाब म्हणजे नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे.   सध्या देशात ६ लाख ९७ हजार ८०२ कोरोनाचे रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी २५ लाख ३६ हजार १३७ वर पोहोचली आहे. याशिवाय ४ कोटी १३ लाख ३१ हजार १५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५ लाख ७ हजार १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.९८ टक्के इतका खाली आला आहे.

Protected Content