एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

ssbt mahaviyala news

जळगाव प्रतिनिधी । श्रम साधन बॉम्बे ट्रस्ट संचालित इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, बांभोरी महाविद्यालयांमध्ये नुकतेच डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पालक सभेस पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व पालकांची नोंदणी करण्यात आली. दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.सी.कछावा, प्रमुख पाहुणे एम.एम. अन्सारी होते. महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम राबवते त्याची पालकांना माहिती असावी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच विद्यर्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या उद्देशाने पालक व महाविद्यालय यांच्यामध्ये सुसंवाद घडवण्यासाठी हि पालक सभा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अपर्णा लाड, यांनी विद्यार्थाना व पालकांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, जर विद्यार्थ्याला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाला जीवनात शिस्तीला विशेष स्थान द्यावे लागेल तसेच शिवाय परिश्रमा शैक्षणिक प्रगती साधता येणार नाही. या सर्व गोष्टी महाविद्यालय विद्यार्थाना देण्याचा प्रयत्न करते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी विद्यार्थाना व पालकांना संबोधित केले ते म्हणाले कि महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साथ सदैव तत्पर असते. विविध उपक्रम जसे कि, विशेष व्याख्यान, कार्यशाळा, विविध क्रीडा, रुग्णालयास भेट, फार्मा कंपनीला भेट तसेच विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. पालकांनीही आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. महाविद्यालय व पालक यांच्या सामाईक परिश्रमातून विद्यार्थी घडेल व एक आदर्श नागरिक व आदर्श फार्मासिस्ट या देशाला आपण देऊ. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.सी. कछावा यांनी सांगितले कि काळ बदलला आहे त्यानुसार पालकांनी आपली मानसिकता बदलवायला हवी, आपण आपल्या पाल्याचे मित्र कसे बनू या कडे सर्वानी लक्ष्य द्यायला हवे. प्रमुख पाहुणे श्री. एम. एम. अन्सारी यांनी पालकांनी उद्देशून म्हणाले कि पालकांनी रोज आपल्या पाल्याकडे अभ्यास व इतर गोष्टींची विचारणा करायला हवी जरी आपण अशिक्षत असलो तरी. पालकांनीही महाविद्यालय व पाल्याच्या प्रगती विषयी व्यासपीठवर आपले मत मांडले.

हर्षल चौधरी, महेंद्र राजपूत, विकास जाधव, श्रीकांत मराठे यांनी आपले विचार व्यक्त केले व महाविद्यालयाच्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष डीफार्मसीच्या विद्यार्थी अचल पाटील, राजश्री राऊळ, योगिता चौधरी, योगिता राखुंडे, ललित पाटील, कुमार हर्षल चौधरी, कुमार ललित पुराणिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.के.एस. वाणी, डॉ.एस.पी. शेखावत यांनी विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या.

Protected Content