बोलत उभे असलेल्या तरूण-तरूणीला लाकडी काठीने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ओंकारेश्वर मंदिरा जवळील रोडवर बोलत असलेल्या एका तरुण आणि तरुणीला दुचाकीवरील एका लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आला आहे.  या संदर्भात एकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  भावेशर नरेंद्र सपकाळे (वय-१८)  रा. एसएमआयटी कॉलेज जवळ, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भावेश सपकाळे हा त्याची मैत्रिणीसोबत शहरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील रोडवर बोलत उभे होते. त्यावेळी शुभम नावाचा तरुण हा त्याची पल्सर गाडी (एमएच १९ जेए ४५५५)ने आला व भावेशच्या मैत्रीणीला दुचाकीची धडक दिली.  त्यानंतर तिला काठीने मारहाण करून डाव्या डोळ्याजवळ मारून दुखापत केले. तर भावेश सपकाळे याला देखील मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर भावेश सपकाळे हा मैत्रीणीसोबत रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले आणि शुभम नावाच्या तरुणाविरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून  रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाठक करीत आहे.

Protected Content