दमदार गोलंदाजीमुळे भारताचा दणदणीत विजय

मॅन्चेस्टर वृत्तसंस्था । फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसतांनाही दमदार गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव करत विश्‍वचषकातील आपला विजयरथ कायम राखला आहे.

विराटने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कोहलीच्या ७२ धावा आणि धोनीने अर्धशतकी खेळी केल्याने भारताला २६८ धावसंख्या करता आली. खरं तर हे आव्हान फारसे मोठे नव्हते. तथापि, भारतीय गोलंदाजासमोर विंडीजच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकल्याचे दिसून आले. मोहंमद शमीने चार गडी बाद करून विंडीजला दणका दिला. तर बुमराहने दोन गडी बाद केले. विंडीजचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. यामुळे भारतीय संघाने तब्बल १२५ धावांनी विजय मिळवला. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी आपल्याला फक्त एका विजयाची आवश्यकता आहे.

Protected Content