खान्देश व्हर्च्युअल रनमध्ये भुसावळ रनर्सचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ प्रतिनिधी | येथील जळगाव रनर्स ग्रुप आयोजित खान्देश व्हर्च्युअल रन २०२१ या २१ किमी, १० किमी, ५ किमी व ३ किमीच्या रनिंगमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या साठहून अधिक धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला.

शनिवार. दि.१८ व रविवार, दि.१९ डिसेंबर रोजी धावपटूंनी आपल्या सोयीनुसार व वेळेनुसार स्वतःच्या शहरातून यामध्ये सहभाग नोंदवायचा होता. कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही स्पर्धा वर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली. धावण्याचे निर्धारित अंतर पूर्ण केल्यानंतर प्रत्येक धावपटूने मोबाईल मधील रनिंग ॲपच्या सहाय्याने नोंदविलेल्या अंतराचा फोटो आयोजकांनी सांगितलेल्या संकेतस्थळावर अपलोड करायचा होता. सदर नोंदीची पडताळणी केल्यानंतर यशस्वी धावपटूंना आयोजकांतर्फे प्रमाणपत्र, पदक व टी-शर्ट प्रदान करण्यात येईल अशी माहिती प्रवीण फालक यांनी दिली.

भुसावळच्या धावपटूनी सदरचा रन शनिवारीच पूर्ण केला. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. २१ किमीसाठी पहाटे ४:३० वाजता, १० किमीसाठी पहाटे ५:३० वाजता, ५ किमीसाठी ६ वाजता तर ३ किमीसाठी सकाळी ६:३० वाजेला धावायला सुरुवात करण्याची वेळ ठरविण्यात आली होती. धावणे पूर्ण झाल्यानंतर सर्व श्रेणीतील धावपटूंची एकत्रित सकाळी ७:३० वाजता स्ट्रेचिंग एक्झरसाइज घेण्यात आली.

२१ किमीच्या धावपटूंसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, झेडटीएस, नाहाटा चौफुली, वसंत टॉकीज समोरून जळगाव रोडवरील वाय पॉईंट आणि तेथून पुन्हा परत क्रीडांगणावर असा मार्ग ठरविण्यात आला होता. या श्रेणीत डॉ. नीलिमा नेहेते व प्रिया पाटील या महिला धावपटूंनी सहभाग नोंदविला त्यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.१० किमीसाठी झेडटीएस मार्ग वगळता २१ किमीसाठी असणारा शहरातील जामनेर रोड व जळगाव रोडवरील मार्ग कायम ठेवण्यात आला होता. ऐश्वर्य वर्मा व संस्कार पाटील या बालकांनी देखील १० किलोमीटर रनिंगमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. ५ किमीसाठी क्रीडांगण ते नहाटा चौफुली व परत क्रीडांगण तर 3 किमीसाठी क्रीडांगण, अष्टभुजा मंदिर व परत क्रीडांगण असा मार्ग होता.

डॉ. नीलिमा नेहेते, प्रिया पाटील, प्रदीप सोलंकी, संदीप कुमार वर्मा, विजय पाटील, उमेश घुले, प्रवीण वारके, रंजीत खरारे, गणसिंग पाटील, विजय फिरके, विलास पाटील, सचिन मनवानी, कैलास छाब्रा, प्रकाश आठवानी, युवराज सूर्यवंशी आदी धावपटूंनी २१ किमी रनमध्ये सहभाग घेतला. तर नीलांबरी शिंदे, चित्रा करकरे, मिनी जोसेफ, डॉ. चारुलता पाटील, मीना नेरकर, सीमा पाटील, आराधना तांबे, ऐश्वर्या वर्मा, संस्कार पाटील, छोटू गवळी, आनंद सपकाळे, सारंग चौधरी, सौरभ सरकार, डॉ. निर्मल बलके, इसाक गवळी, राकेश पाटील ,अभिजित शिंदे, जिजाबराव चौधरी, दीपेशकुमार सोनार, हर्षल लोखंडे, श्रीकांत नगर नाईक, विलास सुखदेवे, प्रवीण पाटील या धावपटूंनी १० किमी रनमध्ये सहभाग घेतला. पूजा बलके, पारुल वर्मा, डॉ उमाकांत चौधरी, आरती चौधरी या धावपटूंनी ५ किमी रनमध्ये सहभाग घेतला. तर कांचन पाटील, देवेंद्र पाटील, विद्याधर इंगळे तर 3 किमी रनमध्ये सहभाग घेतला.

खानदेश वर्च्युअल रनमध्ये भुसावळ येथील धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याबद्दल जळगाव रनर्स ग्रुपच्या किरण बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ. राहुल महाजन, डॉ. सोनाली महाजन, उमेश महाजन, ज्ञानेश्वर बढे या सदस्यांनी सर्व धावपटूंचे अभिनंदन केले.

Protected Content