बाल कविता संग्रहालयाच्या २००० प्रती मुलांना मोफत वाटप

एरंडोल प्रतिनिधी । येथील कवी, साहित्यिक विलास मोरे यांचे अतड्म ततड्म या बाल कविता संग्रहातील शेती माती विषयक बाल कविता शेत शिवार या नावाने पुर्न प्रकाशित करण्यात आले असून या कविता संग्रहाच्या २०००  प्रति शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत वितरण करण्यात येणार आहे.  

पुण्यमत प्रकाशन पुणे व ग्लोबल अँग्रो फाऊडेंशन प्रा . लि .  पुणे यांचे सयुक्त विद्ममाने हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आले आहे. मुख्य संपादक विठ्ठल राजे पवार यांनी या कविता संग्रहाचे प्रकाशन फास या चित्रपटाचे प्रिमीयर शो चे समारंभात मुंबई येथे केले.  यावेळी त्यांनी विलास मोरेंच्या कविता या  अस्सल शेती मातीशी तादात्म्य पावणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या शद्बांना मृदगंध प्राप झाला आहे . हा मातीचा सुवास शेत शिवारच्या रूपाने पुर्नप्रकाशित करून तो शेतकऱ्यांच्या ओंजळीत भरण्यासाठी या संग्रहाचे  देशभर मोफत वितरीत करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले . 

या शेती शिवार विषयक कवितामधून शेती मातीची ओढ निर्माण होऊन भावी पिढी शेती मातीच्या  मुळ व्यवसायात उत्साहाने सहभागी व्हावी हा हेतू प्रकाशक  तथा शरद जोशी शेतकरी विचार मंच महाराष्ट्र  राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी विषद केला . या मुळे शेतकऱ्याच्या प्रती माझे उत्तरदायित्व मी काही प्रमाणात सिद्ध करू शकलो असेही त्यांनी विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत नमुद केले .

विलास मोरे हे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र ऊपाध्यक्ष असुन  या निमित्ताने शेत शिवार या  त्यांच्या कविता संग्रहाने शेतीनिष्ठा जपती आहे असे मतही  त्यांनी व्यक्त केले .

Protected Content