राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत लातूरचे दोन्ही संघ विजयी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात ४८ व्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मुलांचा आणि मुलींमध्ये लातूरच्या दोन्ही संघांनी विजयी झाले आहे. तर दोन्ही गटात उपविजेते नागपूर संघ ठरला तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या संघांना समाधान मानावे लागले. रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विजयी, उपविजेयी व तृतीय क्रमांक  संघांना जळगावच्या पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे चषक देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर गोरे जैन इरिगेशनचे अनिल जोशी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख, महावीर क्लासेसचे नंदलाल गादीया, रेफ्री बोर्डचे चेअरमन पुरुषोत्तम पंत, महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष फारुक शेख, राज्य संघटनेचे खजिनदार अरविंद गवळी, दत्ता सोमवंशी व जिल्हा संघटनेच्या सचिव अंजली पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक देण्यात आली.

या स्पर्धामध्ये अवनीश रावडे  व शंतनु देशपांडे (पुणे), विभास लोहार व रोजा कलावंत (कोल्हापूर), निधी थापा (मुंबई), उत्कर्ष पाटील (लातूर) आणि तनिष्का (नागपुर) यांना उत्कृष्ठ खेळाडू म्हणून घोषीत करण्यात आले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन इरिगेशन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी,  काशिनाथ पलोड हायस्कूल,  नूतन मराठा कॉलेज, महावीर क्लासेस , सनशाइनचे राजेश चौधरी, के के कॅन्स  रजनीकांत कोठारी ,डॉक्टर राजेश पाटील, डॉक्टर मिलिंद बारी,  सातपुडा मोटरचे बच्छाव सर, स्पोर्ट्स हाऊस आमीर शेख, अजय पाटील, भास्कर मसाले,नवजीवन सुपर शॉप ,सुप्रीम, गीतांजली केमिकल,आदींनी या स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले. पारितोषिक वितरण समारंभाचे समारोपीय प्रस्तावना फारुक शेख यांनी सादर केली तर प्राचार्य देशमुख यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा भिडे तर आभार अंजली पाटील, विनोद पाटील यांनी मानले.

Protected Content