बसस्थानकात विवाहितेची मंगलपोत लांबविणारे दोघे अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । माहेरी निघालेल्या विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून पळ काढणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना होमगार्डच्या मदतीने पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विटनेर (जळके) ता.जळगाव येथील सासर आणि मोंढाळे ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या शुभांगी राहुल ठोंबरे (वय-२५) ह्या भाऊ गोलू विरभार एरंडे (वय-२०) रा. मोंढाळे ता. पाचोरा दिवाळीनिमित्त जळगावातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या मामांकडे भेटण्यासाठी आल्या होत्या. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारा माहेरी मोंढाळे येथे जाण्यासाठी बसने जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. ११.३० वाजेच्या सुमारास जळगाव-पाचोरा बस लागल्याने विवाहिता भावासोबत बसमध्ये चढत असतांना दोन अल्पवयीन (अंदाजे वय -८ आणि ५) मुलांनी विवाहितेच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र लांबविले. दरम्यान, मंगलपोत लांबविल्यानंतर दोन्ही मुलांनी पळ काढला असता बसस्थानकात गस्त असलेले होमगार्ड पुरूषोत्तम पाटील आणि सुनिल शिरसाठ यांच्या लक्षात आले. त्यांनी दोघांचा पाठलाग केला मात्र मिळून आले नाही. पोत लंपास केल्यानंतर हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. होमगार्ड यांनी जिल्हा पेठ ठाण्यातील पोलीस कर्मचारी सतिष करणकाळ यांनी दुचाकीने दोघाचा पाठलाग केला. दोघांनी पत्रकार कॉलनी आणि बसस्थानक यांच्या डेपोजवळच्या भिंतीच्या आडोशाला लपून बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले. विवाहितेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content