भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण जखमी

जळगाव प्रतिनिधी । ममुराबाद रोडवर पायी जाणाऱ्या तरूणाला भरधाव दुचाकीने जोरदार धडक देवून गंभीर दुखापत केल्याची घटना घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुकापोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिस समद पटेल (वय-३४) रा. पटेलवाडा ममुराबाद ता.जि.जळगाव हा तरूण मजुरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. बुधवार १८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अनिस पटेल हा तरूण ममुराबाद रोडवरील हॉटेल मितवासमोरून पायी घरी जात असतांना भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ सीबी ४०९२) ने मागुन येवून जोरदार धडक दिली. या धडकेत अनिस पटेल हा तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघात स्थळाहून दुचाकीधारक दुचाकी घेवून पसार झाला होता. उपचारानंतर अनिस पटेल यांनी गुरूवारी २० जानेवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीधारकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ साहेबराव पाटील करीत आहे.

Protected Content