अशोक जैन यांची पत्रकारिता क्षेत्रातून स्वेच्छानिवृत्ती ; शेंदूर्णी दुरक्षेत्राकडून सत्कार

 

शेंदूर्णी प्रतिनिधी । शेंदूर्णी शहर पत्रकार संघाचे मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र सरकार मान्य जेष्ठ पत्रकार दैनिक देशोन्नतीचे स्थानिक वार्ताहर अशोक मोतीलाल जैन यांनी ४४ वर्षाच्या प्रदीर्घ पत्रकारिते नंतर १ नोव्हेंबर २०२० रोजी पत्रकारितेतून निवृत्ती घेतली त्याबद्दल आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पहुर पोलिस स्टेशन अंतर्गत शेंदूर्णी दुरक्षेत्राकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांच्या स्वेच्छानिवृत्तीनिमित्ताने शेंदुर्णी दूरक्षेत्राकडून सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पो. ना. किरण शिंपी होते. कार्यक्रमासाठी शेंदूर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अहिरे, उपाध्यक्ष ऍड. देवेंद्र पारळकर, सदस्य डॉ. दीपक जाधव, डॉ.निलम अग्रवाल, दिग्विजय सूर्यवंशी, योगेश सोनार, सुनील गुजर, प्रवीण कापुरे, संतोष महाले तसेच पो. ना. गजानन ढाकणे, होमगार्ड मनोज गुजर, भोई,कडोबा पाटील उपस्थित होते. यावेळी अशोक जैन यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन दुरक्षेत्राचे वतीने पो. ना. किरण शिंपी, गजानन ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किरण शिंपी यांनी जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांच्या पत्रकार क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. यावेळी ऍड. देवेंद्र पारळकर, डॉ.निलम अग्रवाल, डॉ. दीपक जाधव यांनी जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त केले व उर्वरित आयुष्यात आरोग्य संपन्न सुयश चिंतन केले. सत्काराला उत्तर देतांना अशोक जैन यांनी आपल्या ४४ वर्षात आलेल्या गोड कटू अनुभव सांगितले तसेच पत्रकारितेत २० वर्षे जनशक्तीचे संस्थापक संपादक कै. ब्रिजलाल पाटील , २२ वर्षे देशोन्नती संपादक मनोज बारी, यांचे सहकार्य लाभले, साप्ताहिक धर्मसाथी संपादक म्हणून २२ वर्ष काम पाहिले. नोकरी करतांना सहकार महर्षी अप्पासाहेब रघुनाथराव गरूड, कै.पंडित दादा गरूड, कै. दत्तात्रय गुजर, कै. रमनलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनाची जडणघडण झाल्यामुळे जीवन यशस्वी झाल्याचे सांगितले व त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले. शेंदूर्णी पत्रकार संघातील सर्व पत्रकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच सहकारातील, व शासकीय कर्मचारी यांचेही सहकार्याबद्दल आभार मानले. पत्रकार दिग्विजय सुर्यवंशी यांनी कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल पोलीस दुरक्षेत्र कर्मचारी यांचे आभार मानले.

Protected Content