बायपास काँक्रीट मिक्सर वाहनाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।   जळगाव तालुक्यात दुचाकी व वाहनांचे चोरीचे प्रकार होत असताना आता काँक्रीट मिक्सर वाहनही अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना जळगाव तालुक्यातील भादली गावाजवळ रेल्वेच्या अंडरपास जवळ गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की,जळगाव तालुक्यातील भादली गावाजवळ चौपदरी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काँक्रीट मिक्सर वाहनासह इतर सामग्री आणून ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणाहून गुरुवार ९ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने काँक्रीट मिक्सर वाहन लांबविले.

ही बाब शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीला आली.  बांधकाम व्यावसायिक सुमित महेंद्र चोरडिया (४०, रा. भुसावळ) यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करीत आहेत.

Protected Content