मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या एकाच्या पिशवीतून रोकड लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका व्यक्तीच्या कापडी पिशवीतून साडेचार हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुवर्णसिंग भरतसिंग राजपूत (वय-५१, रा. गणेश कॉलनी) हे १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता फुले मार्केट परिसरात गेले होते. त्यांनी सोबतच्या कापडी पिशवीत रोख रक्कम ठेवली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने पिशवीतील ४ हजार ५०० रुपये चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण करीत आहेत.

Protected Content