चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीने जळगावकडे येत असतांना भरधाव बोलेरो वाहनाने जोरदार दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमीस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

उमाळा येथून दुचाकीने जळगावकडे येत असतांना समोरुन येणार्‍या बोलेरो या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील खोटेनगरातील अमोल देविदास पाटील (वय-३५) हा तरुण दि. १ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्याच्याकडील (एमएच १९ सीबी १९४३) क्रमांकाच्या दुचाकीने उमाळा येथून जळगावकडे येत होता. यावेळी उमाळा ङ्गाट्याजवळ समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच १९ एस ९३८६) क्रमांकाच्या बोलेरो गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोल यांच्या मांडीसह डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयता उपचार सुरु असून बोलेरो वाहनावरील चालकाविरुद्ध प्रविण विक्रम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content