पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

मोहाली वृत्तसंस्था । कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी-२० सामन्यात सात गड्यांनी नमवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणार्‍या क्विंटन डी-कॉकने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. डी-कॉकने ७ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावा केल्या. यानंतर टेंबा बावुमा आणि डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या षटकांमध्ये या जोडीने चांगली पलंदाजी केली. यामुळे आफ्रिकेला १४९ धावांपर्यंत पोहचण्यासाठी मदत झाली. भारताकडून दिपक चहरने २, रविंद्र जाडेजा-नवदीप सैनी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

भारतीय डावाची सुरवातही डळमळीत झाली. सलामीवीर रोहित शर्मा लवकरच बाद झाला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसर्‍या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. शिखर धवन ४० धावांवर बाद झाला. यानंतर ऋषभ पंतही लवकर परतल्याने विराट कोहलीने श्रेयस अय्यरला साथीला घेत आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताचा विजय साकार केला.

Protected Content