धरणगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर व भाजपच्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांनी आपला अपक्ष अर्ज थोड्याच वेळापूर्वी मागे घेतला. यामुळे आता जळगाव ग्रामीणमधील राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादीने धरणगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतू माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी राष्ट्रवादीसह अपक्ष अर्ज दाखल होता. दरम्यान, गुलाबराव देवकर आजच कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे. तरी देखील विशाल देवकर यांनी माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता देवकर कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे भाजपच्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांनी देखील माघार घेतली आहे. मात्र, त्यांचे पती नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांचा अपक्ष अर्ज अजूनही कायम आहे.