Home क्रीडा जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे यश

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे यश

0
38


जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची विध्यार्थिनी  स्वरा वाघ, ऋतुजा भंडारी व खुश हसवाणी या विद्यार्थ्यानी एकलव्य क्रीडा संकुल आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमाकाचे यश संपादन केले आहे.

 

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची विध्यार्थिनी  स्वरा मुकेश वाघ हिने १०० मी. फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक, ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारातही सुवर्ण पदक तर ५० मी. फ्री स्टाईल या प्रकारात रोप्य पदक मिळवत  या विध्यार्थिनीने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यश संपादन केले आहे. तसेच ऋतुजा हर्शल भंडारी या विध्यार्थिनीने रिले प्रकारात सुवर्ण तर ५० मी. फ्री स्टाईल या प्रकारात कास्य पदक पटकावले. यासह खुश विक्रम हसवाणी या विद्यार्थ्याने देखील बँकस्ट्रोक या प्रकारात कास्य पदक पटकावले आहे. यावेळी या स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या १९ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले. तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण तसेच जलतरण प्रशिक्षक वैभव सोनावणे व जागृती परदेशी यांचे या सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.


Protected Content

Play sound