जुलूस -ए- ईद -ए -मिलाद उन नबी चे उद्या आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र, महत्त्वपूर्ण व मोठा सण जशने  -ईद -ए -मिलाद उन नबीनिमित्त  सालाबाद प्रमाणे यंदाही मरकझी जुलूस ए ईद ए मिलाद उन नबी ( शोभायात्रा) चे उद्या रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 

उद्या रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३०  वाजता अहले सुन्नत  वल जमात,जुलुसे  ईद-ए-मिलादुन्नबी कमिटी व मरकज सुन्नी जामा मस्जिद  व सर्व आशिके रसूल यांच्यातर्फे जुलूसचे  आयोजन करण्यात आले आहे. या  जुलूसची सुरुवात इमाम अहमद रजा चौक भिलपुरा येथे होऊन सांगता मुस्लिम कब्रस्थानात होईल.  तरी सर्व आशिकाने रसूल गुलामे रसूल यांनी वेळेवर मरकझी जुलूस  मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सै.अयाज अली नियाज अली,  मौलाना जाबीर रजा, मौलाना अब्दुल रहीम कादरी,  मौलाना वासेफ रझा,  मौलाना मुबारक अली, मौलाना नौशाद साबरी, मौलाना हनीफ रजा, मौलाना रजा खान यांनी केले आहे.

 

Protected Content