जयदेवांचा मुलगा उध्दव ठाकरेंसोबत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज त्यांच्याच मुलाने आपल्या काकांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात ठाकरे घराण्यातील तीन सदस्यांना आपल्या सोबत असल्याचे दाखवून उध्दव ठाकरे यांना धक्का दिला होता. यात जयदेव ठाकरे, स्मीता ठाकरे आणि निहार ठाकरे यांचा समावेश होता. यामुळे शिंदेंनी ठाकरे घराण्यात उभी फूट पाडल्याचे मानले जात होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी आज याची परतफेड केली आहे.

जयदेव ठाकरे यांचे पुत्र जगदीप ठाकरे यांनी आज उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उध्दव ठाकरे यांनी शिंदेंनी केलेल्या आघाताचे काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल केल्याचे मानले जात आहे.

Protected Content